अजित दादांची थातुरमातुर पत्रकार परिषद.!

Share

एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
राज्यातील गाजलेल्या व्यवहार प्रकरणावर आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थातुरमातुर पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद काही मिनिटांचीच होती, परंतु तिच्यातून नवीन काही समोर आले नाही.

अजित दादांनी स्पष्ट केले की, “या व्यवहारात माझा कोणताही सहभाग नाही, माझा संबंध कुठेही नाही.” मात्र या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे एकही पैसा न घेता रद्दबदल केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्य आरोपींना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

यामुळे जैन घोटाळ्याची आठवण झाली आहे — त्या प्रकरणातही मोठा गाजावाजा झाला, पण शेवटी कागदपत्रे रद्द करून व्यवहार संपुष्टात आणण्यात आला. आता या प्रकरणाचाही तसाच शेवट होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

“गुन्हा करायचा, आणि तो उघडकीस आल्यानंतर करार रद्द करून सर्व काही संपल्याचे दाखवायचे,” अशा प्रकारे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सध्या या प्रकरणाचा चौकशी अहवाल अद्याप प्रलंबित असून राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे खळबळ माजली आहे.


Share

3 thoughts on “अजित दादांची थातुरमातुर पत्रकार परिषद.!

  1. अस तसकस काय नुसता1800कोटी शे
    80,000 कैटिचा रिकॉर्ड तरी मोडायचे.३

  2. अस तसकस काय नुसता1800कोटी शे
    80,000 कैटिचा रिकॉर्ड तरी मोडायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *