
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
कोरोची : अनुभव शिक्षा केंद्राची एक दिवसीय संवादक कार्यशाळा रत्नदीप हायस्कूल, कोरोची या ठिकाणी संपन्न झाले.जिल्हा समन्वयक अशोक वरुटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौरभ पोवार यांनी आम्ही प्रकाशबीजे गीत सादर केले. उद्घाटन प्रसंगी डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवर प्रशिक्षकांना पुस्तक आणि नॅपकीन बुके देवून सत्कार करण्यात आला.
उद्घाटन करताना संविधान संवाद समितीचे राज्य कार्याध्यक्ष सुनिल स्वामी म्हणाले,” जगाला परिवर्तन आवश्यक असते, पण परिवर्तनासाठी करावयाचे प्रयत्न आणि विचार मात्र संवादकांना पेरावे लागतात.त्यासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते.”
पहिल्या सत्रात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी लघुपट संवाद याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी संवादाचे तंत्र आणि मंत्र सांगताना अगली बार, भुले बिसरे गीत, शहीद भगतसिंग चित्रफीत, सनफ्लाॅवर साॅंग दाखवून प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर भोजनाचा विश्राम घेण्यात आला.
जेवणानंतर अमोल पाटील यांनी चमत्कार सादरीकरण यावर प्रात्यक्षिक शिकवले. अनुभव शिक्षा केंद्राच्या जिल्हा कार्याध्यक्ष स्नेहल माळी आणि विभावरी नकाते यांनी महिला संवाद यावर प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी साद चांद कोटी, आदित्य धनवडे, अविनाश पोवार यांनी मदत केली.
यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या रेश्मा खाडे, शरद वास्कर, सनोफर नायकवडी, वैभवी आढाव, अमित कोवे, प्रफुल्ल आवळे आणि उर्मिला कांबळे आदिंसह निवडक कार्यकर्ते सहभागी होते. अमोल पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक वरूटे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.
छान उपक्रम
Nice