
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई,खारेगाव पुलावर शनिवारी रात्री नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बाईक ला भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत बाईक वर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वाहनाचा आणि ड्राइवर चा पोलीस शोध घेत आहेत.
मुझम्मील बरकतूल्लाह शेख वय 23 वर्षआणि नौशाद आलम निजामुद्दीन अन्सारी वय 25 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मुंबईतील गोवंडी भागात राहतात. शनिवारी रात्री दोघेही बाईक वरून नाशिकहून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यांची बाईक खारेगाव पुलावर येताच मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या बाईक ला जोरदार धडक दिली. या अपघातात मुझम्मील आणि नौशाद यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
Rip
Rip