अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा..

Share

प्रतिनिधी:कांचन जांबोटी


मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ कक्षात दुर्मीळ
साहित्य संदर्शन(प्रदर्शन)

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा देशभरात साजरा करण्यात येतो आहे. तिरंगा डौलाने फडकणार आहे. ‘घर घर तिरंगा ‘या उपक्रमात सर्व जण आपापल्या परीने सामील होत आहेत.
अमृतमहोत्सवाच्या या सोहळ्यात दादरस्थित मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संदर्भ कक्षात ‘स्वातंत्र्याचे महत्त्व आणि लोकांचे योगदान विशद करणारे १९४७ ते २०१६ या कालावधीतील चित्रमय जगत, सत्यकथा, वसंत, माणूस आदीतील निवडक लेख,तसेच पुस्तके व छायाचित्रे यांचे संदर्शन उमा नाबर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आले आहे .
सोमवार सुटीचा दिवस सोडून दररोज सकाळी १०ते संध्याकाळी ५पर्यंत १३ ते २०ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहे अशी माहिती कार्याध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली.
या प्रदर्शनाचा लाभ सर्व साहित्यप्रेमी रसिकजनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *