
प्रतिनिधी :मिलन शहा
महाराष्ट्र : लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृतिदिन व बहिण भावाचा स्नेह वृद्धिंगत करणार रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न.विद्यालयातील विद्यार्थीनींनी वृक्षाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
विद्यालयामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर स्मृतिदिन व रक्षाबंधनाचा कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सचिन भुजबळ तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री भीमराव आवारे सर होते.
विद्यार्थी मनोगतात कु. संध्याराणी मारकड,शिवानी भाळे, ज्ञानेश्वरी राऊत, निरंजन भाळे, श्रुती सवासे, स्वेता निंबाळकर,स्वरांजली फडतरे, समृद्धी खरात, अंतरा बुलबुले या विद्यार्थिनी राजमाता अहिल्याबाई होळकर व रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ.वर्षा जगताप मॅडम यांनी रक्षाबंधन सण फक्त एक दिवसासाठी साजरा न करता शाळा हे कुटुंब समजून विद्यालयातील सर्व मुलींना बहिणीच्या प्रमाणे रक्षा करण्याची जबाबदारी प्रत्येक मुलाची आहे असे सांगितले.अध्यक्षीय भाषणात श्री.भुजबळ सर यांनी सणाच्या मागील आध्यात्मिक दाखले आपल्या भाषणातून विशद केले.राजमाता अहिल्याबाई यांच्याकडून संकटात खचून न जाता सक्षमपणे कसे उभारावे हे शिकता येते असे विचार मांडले.
विद्यालयातील विद्यार्थीनींनी वृक्षाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.धनश्री डोईफोडे व कु.रेणुका माने यांनी केले तर आभार कु. सिद्धी रुपनवर हिने मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.
Khup chan
Good
स्तुत्य उपक्रम