आंबेडकरी विचारवंत रणजीत मेश्राम यांचे निधन!

Share

एसएमएस -प्रतिनिधी.

मुंबई : शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीचे विचारवंत, अभ्यासक आणि प्रभावी वक्ते रणजीत मेश्राम यांच्या दुःखद निधन. ही बातमी अत्यंत वेदनादायी असून चळवळीसाठी मोठी हानी आहे.
रणजीत मेश्राम यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी विचारांची प्रेरणा समाजात रुजवण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि संदर्भासह मांडलेल्या भाषणांमुळे अनेकांना दिशा मिळाली. ते नेहमीच मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण विचार मांडत असत.
त्यांच्या संवादात आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती आणि तिची वाटचाल याबद्दलची त्यांची चिंता आणि कळकळ स्पष्ट जाणवत.
त्यांच्या अचानक जाण्याने आंबेडकरी चळवळीने एक अभ्यासू, प्रखर आणि प्रामाणिक विचारवंत गमावल्याची खंत व्यक्त होत आहे..


Share

One thought on “आंबेडकरी विचारवंत रणजीत मेश्राम यांचे निधन!

  1. ओम शांति ओम खरच बातमी अत्यंत वेदनादायी आहे त्या महान आत्माला शांति प्रदान हों एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *