“आदिवासी बचाव, कातकरी बचाव” आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Share

एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

ठाणे :श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य आणि संस्थापक मा. श्री. विवेक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली “आदिवासी बचाव, कातकरी बचाव” या आंदोलनाने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार स्वरूप घेतले. ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे’ या निर्धारमूलक घोषवाक्याखाली आयोजित या आंदोलनात हजारो आदिवासी बांधवांनी हक्कांसाठी एकदिलाने आवाज उठविला.

या आंदोलनात तीन मुख्य मागण्या मांडण्यात आल्या —

  1. कातकरी मुलींची विक्री-खरेदी थांबविणे,
  2. गावठाणातील हक्क प्रस्थापित करणे,
  3. वनजमिनीवरील हक्कांना मान्यता देऊन ‘बयाना’ पद्धतीचा अंत करणे.

ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातून सुमारे ६० हजार आदिवासी बांधवांनी या लढ्यात सहभाग नोंदवला. संध्याकाळी सात वाजता अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा प्रतीक म्हणून “निर्धाराचा दिवा” लावण्यात आला.

या आंदोलनाला स्थानिक आमदार श्री. संजय केळकर, विधान परिषदेचे आमदार श्री. निरंजन डावखरे, आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित, आमदार शांताराम मोरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ आणि पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.


Share

4 thoughts on ““आदिवासी बचाव, कातकरी बचाव” आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

  1. आदिवासी बांधवांन साठि खरतर कोणते हि लोग मदती करिता लवकर धावुन येत नाहि असे आंदोलनाने करणे गरजेचे झाले आहे

  2. प्रत्येक संस्था,संघटना, प्रतिष्ठानाने अशा प्रकारे आदिवासी कुटुंबांच्या मूलभूत हक्कांसाठी एक दिलाने आवाज उठवायला हवा. जेणेकरून आदिवासींच्या येत्या पिढीला सहज जगता येईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *