आरपीआय चा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर…

Share

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि  पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सह भाजपचे नेते ही उपस्थित राहणार

प्रतिनिधी :

मुंबई,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 
( आठवले) पक्षाच्या मुंबई प्रदेश चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सोमवार 21ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या या प्रशिक्षण शिबिराला रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार असून या शिबिरास  मुंबई उपनगर चे पालक मंत्री ना.मंगलप्रभात लोढा; भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड.आशिष शेलार; शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित  राहून रिपाइं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि  सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी दिली आहे. या रिपब्लिकन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड आणि सरचिटणीस विवेक पवार यांनी केले आहे.

राज्यातील विविध राजकीय घडामोडी;आगामी काळात येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका; तसेच पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे; रिपाइं भाजप शिवसेना युतीची अभेद्य एकजूट आगामी निवडणुकांना सामोरी जात असताना रिपब्लिकन कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर महत्वाचे ठरणार आहे अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे.


Share

One thought on “आरपीआय चा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *