आ.अस्लम शेख,तेजिंदर सिंह तिवाना सह संगीता सुतार यांची प्रतिष्ठा पणाला!!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : उत्तर मुंबईतील काँग्रेस चा गड मालाड विधानसभेत ८पैकी ३ वॉर्डात आमदार शेख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वॉर्ड क्रमांक ३३ मधून शेख यांची मोठी बहीण कमरजहाँ सिद्दीकी, वॉर्ड ३४ मधून त्यांचा मुलगा हैदर अली अस्लम शेख आणि ४८ मधून नातेवाईक रफिक शेख यांना उमेदवारी दिल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी शेख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.वॉर्ड क्रमांक ३३, ३४ आणि ४८ मधून  काँग्रेस चे नगरसेवक होते मात्र साद्या परिस्थिती आरक्षणा मुळे बदलली आहे त्यामुळे ३३ चे माजी नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांची उमेदवारी हुकली तसेच ३४ आणि ४८ वॉर्ड ओपन जनरल झाल्याने ३४ मधून नगरसेविका बहिणीला ३३ मधून उमेदवारी दिली तसेच ३४ मधून शेख यांचे सुपुत्र हैदर अस्लम शेख यांना संधी दिली तसेच वॉर्ड ४८ मधून काँग्रेस नगरसेविका सलमा अलमेलकर यंनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात उडी मारल्याने तिथे रफिक शेख यांना उमेदवारी दिली आहे. ३३, ३४ मध्ये लडाई थोडी सोप्पी आहे. मात्र ४८ मधून दोन माजी नगरसेवका सह काँग्रेस बंडखोर इस्माईल शेख यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी समाजवादि पार्टीतून रफिक शेख समोर मोठे आवाहन उभे केले आहे. तसेच मुस्लिम लीग, एमआय एम, दोन्ही राष्ट्रवादी, बसपा सारखे आणि अपक्ष  आणि आम आदमी पार्टीच्या लारझी व्हर्गिस या ही मुस्लिम बाहुल्या या भागातून  लडत असल्याने यंदा ४८ मध्ये अधीक चुरशी ची बनली आहे तसेच  वॉर्ड ४६, ४७ मधून भाजप चे नगरसेवक असले तरी यंदा शिवसेना विभागल्याने परिस्थिती बदलली आहे. ४६ मधून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे  युती मुळे  मराठी एकत्रित होतील असं चित्र आहे. तरी मागच्या वेळी भाजप च्या योगिता कोळीन्नी दहा हजार हुन अधीक मतांची आघाडी मिळवत विजयी पताका फडकवली होती. ३५ मधून भाजप चे योगेश वर्मा संघटनेच्या जोरावर आणि मोदी यांच्या नावावर सहज जिंकून यण्याची संभावना आहे. तसेच ४७ हा तिवाना परिवाराचा बालेकिल्ला आहे तसेच माजी नगरसेविका जया तिवाना ऐवजी त्यांचे पुत्र तेजिंदर सिंग तिवाना भाजप उमेदवार आहेत तसेच ते भाजपयुवा मोर्चा मुंबई अध्यक्ष असल्याने त्यांची व तिवाना परिवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कारण काँग्रेस ने माजी नगरसेवक परमिंदर सिंग भामरा यांना उमेदवारी दिली आहे तसेच उबाठा+मनसे युती चे गणेश गुरव हे ही  मराठी मते मिळवून मोठे आवाहन उभे केले आहे.

वॉर्ड ४९ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता सुतार यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने त्यांना गड राखण्याचे आव्हान आहे कारण काँग्रेस पक्षाने कोळी समाजाच्या मागणी नुसार संगीता कोळी यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्यावर ही जिंकून येण्याचे दडपन आहे.

त्यामुळे मालाड विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटा सह भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा संघर्ष आ

मनसे उबाठा युती चा प्रभाव ४६, ४७, आणि ३२, ३४ मध्ये दिसेल तसेच वंचित +काँग्रेस युती चा फायदा काँग्रेस ला ३२, ३३, ३४, ४७, ४८, ४९ मध्ये होणार.


Share

2 thoughts on “आ.अस्लम शेख,तेजिंदर सिंह तिवाना सह संगीता सुतार यांची प्रतिष्ठा पणाला!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *