
प्रतिनिधी :एसएमएस -सुरेश बोर्ले
मुंबई : विले पार्ले पूर्वेतील छत्रपती शिवाजीनगर दुर्वांकुर आणि गॅलेक्सी एक्सोटिका या परिसरात सध्या एका जुन्या इमारतीचे तोडकाम सुरू असून या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे आणि ध्वनी प्रदूषण निर्माण झाले आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील अनेक नागरिकांना डोळे, नाक आणि छातीशी संबंधित आजारांचा त्रास होऊ लागल्याची तक्रार समोर आली आहे.
सदर इमारतीचे तोडकाम सुरू असताना विकासक आणि ठेकेदारांनी आवश्यक सुरक्षित साधने वापरलेली दिसत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. तोडकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या यंत्रांमुळे प्रचंड आवाज होतो, तसेच उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनास त्रास होतो. “आवाजाचा त्रास एकवेळ सहन करू, पण आरोग्याशी संबंधित समस्या असह्य आहेत,” अशी प्रतिक्रिया येथील रहिवाश्यांनी दिली.
रहिवाश्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, विकासकाने पाण्याची फवारणी, धुळ नियंत्रणासाठी जाळ्या आणि आवाज कमी करण्याच्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. तसेच परिसरातील वायू व आवाज प्रदूषणाची तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.
दरम्यान, स्थानिकांनी या संदर्भात महापालिकेकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दाखवली असून, लवकरच अधिकृतपणे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होणार आहे.
गंभीर प्रश्न अरोग्यवर परिणाम होणार
धुळीमुळे नागरिकांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असून स्थानिक पोलिस ठाणे, के/पूर्व विभाग महापालिका सहाय्यक आयुक्त,अग्निशामक दल,या सर्वांची मिलीभगत असून पैसे खाणारे वेळोवेळी भोगतात हे देखील सत्य आहे…