एसएमएस-प्रतिनिधी -सुरेश बोर्ले.
मुंबई :मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत आता युद्धविरामाच्या हालचालींना वेग आला असल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिका हे जागतिक स्तरावर प्रभावशाली राष्ट्र असल्याने, तेलसंपन्न देशांवर आपली पकड कायम ठेवण्याचा तिचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळेच इस्रायल–इराण संघर्षात अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
दरम्यान, अमेरिकेकडून युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू असून इराणसमोर काही कठोर अटी ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या अटींमध्ये इराणने अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवावा, तसेच सैन्य केवळ देशाच्या सुरक्षेसाठी मर्यादित ठेवावे, अशा प्रमुख मागण्या असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, इराण या अटींवर सकारात्मक विचार करत असल्याची चर्चा आहे. कारण दीर्घकाळ चालणारे युद्ध कोणत्याही देशासाठी आर्थिक आणि मानवी दृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे संभाव्य युद्धविरामामुळे जागतिक स्तरावर दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, इस्रायल अद्याप माघार घेण्यास तयार नसल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. एकूणच, या घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
AnyWar is againsthumanity..