ईव्हीएम आणि मतदार यादीचा घोळ! पितळ उघडे पडणार???

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : भाजपाने ईव्हीएम मशीन मतदानात आणून!मतदान लाचलुचपत बाजार मांडला आहे,असा संशय जनतेमध्ये आहे. कारण लोकसभा निवडणुकीत
भाजपाने सत्ता खेचून आणली.तर काही ठिकाणी मोठ्या फरकाने विरुद्ध उमेदवार जिंकल्यावर,भाजपा उमेदवाराने आव्हान केलेल्या फेर मतमोजणीत!भाजपचाच उमेदवार जिंकला तेही कांहीं फरकाने.हे काय गौड बंगाल आहे?कारण जनतेला आता ईव्हीएम यंत्रावर संशय येत आहे.कारण विरोधकांना एवढी कमी मते कधीच पडलेली नाहीत.पराभव झाला पण एवढा लिलया कधीच झाला नव्हता. बिहार राज्यात नुकतेच झालेले मतदान व झालेली मतांची तफावत आणि झालेला याद्यांचा घोळही जनतेने पाहिलेली आहे.पाहू तेथे पुढे काय होतय?तर नुकतीच इंडिया आलायन्स ह्या विरोधकांची बंगळूरू येथे नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन .त्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी! ह्यांनी तर एका उत्तरप्रदेशीय माणसाने ४ ठिकाणी कसे मतदान केले! ह्याचा पाढाच फळ्यावरती रेखाटून दाखवला. त्यामुळे आता लोकांची खात्रीच पटलेली आहे की,ह्या मशिनीत व निवडणूक यादीत कांहींतरी काळभेर आहे.आता वर्तमान राज्यकर्ते सारवासारव करत आहेत,पण लोकांचा आता त्या मशीनवर व निवडणूक यादी अपहार प्रकरणी विश्वासच राहिलेला नाही.परंतु लोकसभेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने,विरोधकांना कांहीं करता येत नाही.ही बाब फक्त जनतेपर्यंत नेऊ शकतात.कारण जनताच हे लोकशाहीत मोठे एक हत्यार आहे.त्यांनी हे हत्यार चालवण्या पूर्वी!ह्या गंभीर समस्येचा विचार करावा. कारण”लोकशाही” हे सरकार जनतेने,जनतेसाठी निवडून दिलेले सरकार असते. त्यामुळे जनतेच्या हातात शेवटी कौल आहे.तशी कर्नाटकातही बोंबाबोंब आहे.पाहू काय होतय? महाराष्ट्रातील जनते तर जागरूकच रहावे!कारण येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत, मतदार यादी व ह्या यंत्राद्वारे फसवणूक होण्याची मोठी दाट शक्यता आहे,कारण हिंदूंच्या नावाखाली,भूमिपुत्रांना अवमानित करून परप्रांतीयांसाठी लाल गालिचा पाथरणाऱ्या,ह्या वर्तमान सरकारला हद्दपारच करायची संधी आहे,शेवटी हिंदुस्तानातील जनतेला ही फसवा फसवी पोलखोल कार्याची संधी आहे.त्यासाठी सर्व राष्ट्रातून जबरदस्त विरोध होण आवश्यक आहे.


Share

3 thoughts on “ईव्हीएम आणि मतदार यादीचा घोळ! पितळ उघडे पडणार???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *