
प्रतिनिधी :मिलन शहा
.नांदेड : राष्ट्रीय संविधान बचाव अभियान व विविध पक्ष आणि समविचारी जनसंघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 20 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहेत.
आंदोलकांच्या काही प्रमुख मागण्या मध्ये ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्यात याव्यात.
जन सुरक्षा कायदा रद्द करा,शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करा, देशातील मतदान यादीत घोळ कमी करून त्वरित नवीन यादी तयार कराव्यात, लाडक्या बहिणीला ₹2100 /- मानधन देण्यात यावे,कॉलेज आणि महाविद्यालय स्वाधार स्कॉलरशिप वेळेवर देण्यात यावे.
यावेळी राष्ट्रीय सविधान बचाव राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर सिटू राज्य सचिव कॉम्रेड उज्वला पडलवार,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. श्रावण रॅपन वाड,शिवाशिष दरोडे, 89 नायगाव विधानसभा प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण माधव पा बिलोलीकर, प्रा.उत्तमकुमार कांबळे, प्रा. साहेबराव बेळे, व्यंकटी पवार, मारोती छडीमारे, टेळकीकरसर, चंद्रभान सूर्यवंशी, उत्तम रामा गायकवाड, गणेश सोनकांबळे, अविनाश आंबटवाड, विठ्ठलराव घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
Right