उद्धव बाळासाहेब ठाकरे सेंनेचा मार्ग,खडतर!पण लोकांची सहानुभूती?

Share

File photo
प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,1966ह्या दशकांत स्व.बाळा साहेबांनी “शिवसेना” ह्या संघटनेची मुहूर्तमेढ केली व त्यांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि भूमिपुत्रांनीही हा मुद्दा हक्कासाठी उचलून धरला.त्यामधे दाक्षिणात्य भारतीयांची,मक्तेदारी विशेष मोडून काढली.त्यामुळे ईतर परप्रांतियांना चाप बसला.तर नोकर भरतीमध्ये”स्थानीय लोकाधिकार समिती” अंतर्गत,कीत्येक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळवत,अनेकांना पोटा पाण्याला लावले.भूमिपुत्रांना मुंबईत एकसंध करून अनेकांचे जीवन सफल केले.शिवसेनेचा मूळ पाया व गाभा हा भूमिपुत्रांच्या कल्याणासाठीच होता.परंतु बदलते राजकीय वारे त्याप्रमाणे निर्णयात बदल घेताना परिस्थितीनुसार,साहेबांनी “हिंदुत्व” पत्करले व ते “हिंदुरूदय सम्राट”बनले आणि येथेच संघटना पणाला लागली.कारण हिंदु म्हटलं की सर्व भारतीय जाती जमाती आल्या!कदाचित मुबईत कमी होणारी मराठी लोकसंख्या व त्याचा मतदानावर होणाऱ्या परिणामाने, हा निर्णय साहेबांनी घेतला असावा?असे लोकमत आहे.ही खेळी येणाऱ्या काळासाठी भूमिपुत्रांना मारक ठरली.हिंदुत्वाच्या नादात भूमिपुत्रांची पकड ढीली पडली.तरीही सैनिकांनी साहेबांचा हकुम मानला संघटना पुढे नेली.पण शेवटी साहेबांचं देहावसन झाल्यावर! शिवसेनेचे प्रखर नेतृत्व सरल्यावर,मग मात्र संघटनेची वाटचाल काठीण झाली. भाजप+सेना हे गणित पुढच्या काळात काय घडल ते लोकांना कळलाच नाही. अमित शाह व उद्धव यांच्यात राजकीय ठिणगी पडली आणि दुफ्ली निर्माण झाली.अनेक वर्षे असलेली ही युती दुभंगली. येथे जर का? मुर्रब्बी राजकारणी सेनेपदी असता तर तटस्थ राहिला असता.परंतु येथे उद्धव ठाकरेंचे अनुभव कमी पडले व त्यांना मार्गदर्शन करणारी माणसे पक्षातून गेल्याने परिस्थिती कठीण झाली.सुरुवातीच्या काळातील सच्चे कार्यकर्ते दुरावले.ज्या संघटनेने,ज्यांना नगर सेवक,आमदार,खासदार,मुख्य मंत्री अशी अनेक पदे दिली, ते दुरावले.पण दुफळी नंतर मात्र भाजपा आक्रमक झाली.त्यांनी शिव सेनेच्या अनेक आमदार ,खासदार व मंत्र्यांचे अभ्यासू विश्लेषण व संकलन करून,त्यांच्या हेरान मार्फत धागे दोरे तपासले आणि त्यांना ई डी.चा दणका देत त्यांची हवाच काढून टाकली.ह्या सर्वांनी जोपासलेला स्वार्थ त्यांच्याच गळ्याशी आला.त्यामुळे त्यांना भाजपची कास धरावी लागली.कारण बाळा साहेबांशी ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली,त्यांची परिस्थिती जनतेने पाहिली आहे. ज्या पक्षाने लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या सेवेसाठी व लोकांनी निवडून दिले,पण त्यांनीच आपला स्वार्थ जपत नको ती कामे करून तेच अडचणीत आले.भाजपला हेच पाहिजे होते.त्यांनी ई डी चां दणका देत!प्रत्येकाला,पळताभुई केले.सत्तेत आल्यावर सर्वांगीण अचाट स्वार्थ त्यानि अकारण जपला ,मग त्याला उधवजी काय करणार?मग भाजपच्या गोटात सामील व्ह्या.हेच त्यांनी केले.कारण कारवाई ही होणारच!त्यापेक्षा त्यांच्यात सामील व्हा,हाच पर्याय त्यांनी निवडला.हा पायंडाच निर्माण झाला.हा फॉर्म्युला भाजपने अनेक पक्षानसाठी वाप रला.सगळ्यात मोठी चूक उद्धव ठाकरेंनी केली ती म्हणजे विरोधात रहायचे व तटस्थ रहायचे ,तरच त्यांना फायदा झाला असता.असा लोकांचा कौल आहे.कारण बाळा साहेबांनी काँग्रेसची नेहमीच अवहेलना शेवटपर्यंत केली.त्याच पक्षाची कास उधवजिंनी धरली व हात मिळवणी केली.हे कदाचित लोकांनाही पटलेले नाही.तरीही बाळासाहेबांवर असलेले निस्सीम प्रेम!म्हणून ते उधवजिंच्या मागे अजूनही उभे आहेत.पण ई डी चे शस्त्र आजही धार पाजून उभे आहे.शिवसेनेतील एक एक माणूस ह्या दणक्याने साथ सोडत आहेत.त्याला उधवजी काहीच करू शकत नाहीत.नुकतेच जोगे श्वरी पूर्वेकडील एक आमदार जे श्याम नगर सांरख्या वस्तीत चाळीत रहायचे.आमदार झाल्यावर ये पूनम नगरला बहू मजली इमारतीतील रहायला गेले.सकाळी मातोश्री सारख्या क्रीडा संकुलात व्यायाम करतात.जेथे गरिबांना जाता येत नाही. गाड्या आल्या सुखसोयी आल्या! ई डी मागे लागल्यावर भाजपमध्ये प्रवेश केला.अशा अनेकांनी, आपला भयंकर स्वार्थ सादत!स्व.बाळा साहेबांशी गद्दा री अनेकांनी केलेली आहे,हे प्रत्येकाने जाणून घ्यावे. ये पब्लिक है ये सब जानती है,पब्लिक है, अंदर क्या है बाहर क्या है,ये सब पेहचांती है.ए पब्लिक है! शेवटी जमा खर्चाचा न्याय इस्वराकडे द्यावाच लागणार आहे.असा लोकांचा कयास आहे.शेवटी कर्माची फळे ,ह्याची डोळा!ह्याची देहा इकडेच भोगायची आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *