
प्रतिनिधी:कांचन जांबोटी
मुंबई, पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल पद मानाचे. त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने त्याचा आदर ठेवलेला नाही. मी मुख्यमंत्री असतांना लाॅकडाऊन काळात राज्यपालांनी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळ उघडण्याचा आग्रह. मागे सावित्री बाई फुलें बाबत हिणकस वक्तव्य. काल पुन्हा आपत्ती जनक वक्तव्य. राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी बघितल्या असतील. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे. कोश्यारींनी महाराष्ट्रात “महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा” अस म्हणायची वेळ आली आहे. त्यांना कोल्हापूरच्या वाहणा दाखवणे गरजेचे. त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवावे लागेल. काही ठिकाणी राज्यपाल तत्परता दाखवतात. राज्यपाल महोदयांनी नियुक्त सदस्य बाबत आपल्याला अनुभव. आज मात्र त्यांनी कहर केलाय. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण राज्यपालांना नाही याची खंत. मुंबई ही हक्काने मिळवली आहे कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. परदेशी पत्रकारानी लिहिले आहे 105 नव्हे तर 200ते 250 लोकांनी बलिदान दिले आहे.
राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत शपथ घेतांना जाती पाती एकत्र ठेवायची शपथ. राज्यपालांनी हिंदूं मध्ये फुट जाती पाती धर्मावरुन आग लावणे. त्यांना घरी पाठवायचे का तुरुंगात. अमराठी लोक चिडलेली आहे. गुण्यागोविदानं नांदणारी लोक त्यांच्या फुट. गेली तीन वर्ष महाराष्ट्राने मीठ खाल्ले त्याच्याशी नमक हरामी. नवहिंदूंना विचारणा राज्यपालांच्या बाबतीत करायला हवी. राज्यपालांना तात्काळ परत पाठवावे लागेल.
राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. आग लावू नये राज्यपाल पदाची शान घालवली. मला अनादर करायचा नाही.
हे त्यांच्या ओठातून आलय का पोटातून आलय हा संशोधनाचा विषय
दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत हे राज्यपालांनी आपल्या विधानातून स्पष्ट केलय.
येणाऱ्या काळात निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा विधानाचा हेतू.
आमच्याकडे सोबत अमराठी आहेत. त्यांचे संस्कार ते पाळतात. पण राज्यपालांनी फुट पाडल्याचा प्रयत्न केलाय.