प्रतिनिधी:वैशाली महाडिक
मुंबई,एनसीपी ची महत्वाची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार व प्रमुख नेते हजर होते.
सरकारमधील अनेकांची मंत्रिपदाची महत्वांकांक्षा आहे, मंत्रिपद मिळाले नाही तर ते येणाऱ्या काळात स्वगृही परततील. सरकार अल्पमतात गेले तर ते पडेल, आणि मध्यावधी निवडणुका जाहीर होतील, त्यामुळे निवडणुकांसाठी आतापासून तयारीला लागा. एनसीपी सद्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या, असे एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
उद्या, सोमवारी बहुमत चाचणी होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यानंतर एकनाथ शिंदे सरकार टिकण्याची खरी कसोटी सुरु होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहे.