प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : श्रीलंका स्टिअरिंग कमिटी (SLSC) फॉर न्येलेनी फोरम व आंतरराष्ट्रीय नियोजन समिती (IPC) फॉर फूड सोव्हरिन्टी यांच्या वतीने फोरममध्ये सहभागी होण्यासाठी भारतातुन नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे (NFF) अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ५ ते १४ सप्टेंबर या कालावधीत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट (NICD), कँडी, श्रीलंका येथे आयोजित करण्यात आला आहे.
हा जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण कार्यक्रम एनआयसीडी , कॅनडी, श्रीलंका येथे आयोजित केला जात असून, जगातील वाणिज्य, व्यापार, अन्न व मत्स्य सुरक्षा आणि सहकारी विकास मंत्रालयाच्या अखत्यारित होणार आहे. या फोरम मध्ये जगभरातील शेतकरी नेते, मच्छिमार नेते, अन्न सार्वभौमत्वाचे पुरस्कर्ते, नागरी समाजातील कार्यकर्ते आणि धोरण निर्माते सहभागी होतील. टिकाऊ शेती, कृषी-मत्स्यव्यवसाय पर्यावरणशास्त्र, उत्पादक सहकारी संस्था आणि अन्न उत्पादकांचे हक्क या महत्त्वाच्या विषयांवर संवाद, सहकार्य व धोरणात्मक नियोजन यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ ठरेल. कार्यक्रमा करिता एशिया खंडाचे मच्छिमारांचे नेतृत्त्व करण्याकरिता नॅशनल फिशर्वकर्स फोरम अध्यक्ष व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. किरण कोळी सरचिटणीस महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती यांनी माहिती दिली आहे.
स्वच्छता अभियान या क्षेत्रातून २० सप्टेंबर २०२५ रोजी .देशभरात स्वच्छता अभियान आहे आम्ही सागरी सीमा मंच ( कोकण प्रांत ) कुलाबा मुंबई येथे जमशेटजी बंदर येथे स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे
सागरी सीमा मंच ( कोकण प्रांत ) कुलाबा मुंबई
संयोजक
ऊंच भरारी