एसआरए ट्रानसिट इमारतीचे छत उडून गेले…

Share

फोटो :एसआरए कार्तिक सोसायटीकाचपाडा नंबर 1.

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई :मालाड पश्चिमेतील काचपाडा क्रमांक 1 रामचंद्र लेन येथील एसआरए कार्तिक सोसायटी येथे विकासक यांनी बांधलेल्या ट्रानसिट इमारती चा छत उडून गेला. काही महिन्या पूर्वी  या वस्तीतील घरे पुनरविकासा साठी तोडून येथील रहिवाशा साठी तात्पुरतीं राहण्यासाठी इमारत तयार होईल तोपर्यंत राहण्यासाठी सात मजली ट्रानसिट इमारत विकासक यशवंत गांधी यांनी बांधली आहे या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील छत पावसाड्यात हवे ने उडून गेल्याने सातव्या मजल्यावतील पंधरा  ते सोळा घरात पावसाचे पाणी आले.सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र विकासकाने बांधलेल्या या इमारतीत जर सातव्या मजल्यावरील घरात लोक असती तर त्यांचे आर्थिक नुकसान व जीवितहानी ही झाली असती तसेच हे पत्रे उडून खाली पडले पण सुदैवाने यात ही कोणी जख्मी नाही झाले. येथे प्रश्न असा की विकासक यशवंत गांधी यांनी ट्रानसिट इमारत निकृष्ट दरज्याची बांधली आहे व या पूर्वी ही रहिवाशांनी मुळभूत सुविधान्चा अभाव आणि इतर समस्ये बाबत पालिका, जिल्हाधिकारी, एसआरए चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बाबत तक्रारी केल्या आहेत.

चौकट:साधारणत वर्षाभर पूर्वी या इमारतीच्याचौथ्या मजल्यावरून पडून एक रहिवासी शिफ्टिंग करत असताना पडून दुर्दैवी मृत्यू झालं होत. तसेच गटारे तुंबणं, नळाला पाणी न येणे अशा अनेक समस्यानी हे प्रकल्प ग्रस्त आहे. तसेच 16 हुन अधीक वर्षांपासून हे प्रकल्प रखडलेले आहे.


Share

2 thoughts on “एसआरए ट्रानसिट इमारतीचे छत उडून गेले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *