प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई: मुंबईच्या आझाद मैदानात,मराठा आंदोलक व नेते ठाण ठोकून बसलले आहेत.अजूनही वर्तमान सरकारने याची दखल घेतलेली नाही.ह्या संबंधी मंत्री व आमदार लागोपाठ सभा चर्चा करीत आहेत.पण तोडगा काही निघत नाही.परंतु ओबीसी समाजात कारण नसताना,आंदोलने बैठकांच आयोजन आणि विरोधाची घाई केली जात आहे.ह्या सभा आणि बैठका कश्यासाठी?का?हेच कळत नाही. बरं तुम्ही सध्या हा खटाटोप करून, आपली दिशा व शक्ती वाया घालवताय असे चित्र दिसते.वास्तविक पाहता आपण नागपूर येथे आंदोलन करताय!कोण आपल्या पाठीशी समाज किंवा लोक दिसत नाहीत किंवा सध्या सुरू असलेले मराठा आरक्षण भेदण्याची शक्ती तुमच्यात आहे का?समजा सरकारने ओबीसी मधून आरक्षण त्यांना दिलं!तर ते रद्द करण्याची ताकद तुमच्याकडे आहे का?मराठा सरकारशी भांडत आहेत,तुमच्याशी नाही!हे आधी लक्षात घ्या!सरकारला आधी काहीतरी निर्णय घेऊ द्या,मगच तुम्ही तुमची दिशा ठरवा.हे जनतेच मत आहे. उगाचच कोणीतरी आपल्या हक्कासाठी लढताना,त्यांच्यात खोडा घालणं हे साफ चुकीचं आहे.आज ह्या मराठ्यात सरकारला उलथविण्याची हिंमत व शक्ती आहे.तुमच्याकडे आहे का? आज सरकारने अन्न,निवारा, पाणी याची वानवा केली आहे.पण मराठा व इतर
समाज भाईंनी त्वरित ही सगळी व्यवस्था केली.तुम्ही करू शकाल का? ओबीसी हा सर्व बाबतीत सदन आहे का?जेवढा मराठा समाज आहे.म्हणून लोकांना असे वाटते की काहीतरी निर्णय होऊ द्या! मग त्या अनुषंगाने निर्णय घ्या !छत्रपतींची रणनीती वापरा,गनिमी कावा वापरा. मनुष्य बल कमी होत तरी
महाराजांनी शत्रूला भंडावून सोडले होते.ती नीती वापरा! आंदोलकां पेक्षा सरकारला कोंडीत पकडा हे उत्तम राहील. त्यामुळे राजदरबारी काय निर्णय होतो याची वाट पहा व मगच निर्णय घ्यावा!ही अशी जण भावना आहे.ही महत्वाची नोंद ओबीसी नेत्यांनी व समाजाने घ्यावी हेच समाज मनात आहे असं दिसतंय.
बरोबर
बरोबर