
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन व विविध आंबेडकरी संघटनेने केली मागणी
करणी सेनेच्या अजय सेंगर यांनी भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभा बाबत केलेल्या वादग्रस्त विधान बाबत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा. व अटक करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन व विविध आंबेडकर संघटनाने समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांना निवेदन देऊन मागणी केली.
भीमा कोरेगाव प्रकरण एवढे संवेदनशील असताना अशा प्रकारची मागणी कोणी कशी व का करू शकतो हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.,2018 साली खूप मोठी दंगल घडली होती.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ बुलडोजर लावून काढून टाकावे. अशी मागणी एका पत्राद्वारे करणी सेनेच्या अजय सिंगर यांनी केली आहे. यामुळे समस्त बहुजनाच्या भावना दुखावले आहेत. व राज्यात दंगल सुद्धा घडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजय सेंगर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी. अन्यथा खूप मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी.
अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर सर्व आंबेडकरी व बहुजनवादी संघटनाच्या वतीने खूप मोठे आंदोलन करतील याची नोंद घ्यावी. असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे.
करणे सेनेचा अजय शेंगर याला त्वरित अटक करावी. अन्यथा त्याचा चोख बंदोबस्त केला जाईल.
महाराष्ट्रात जर कोणत्या प्रकारची दंगल घडली तर यास पूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जबाबदार राहतील.
सुनील गमरे मालाड तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
अशा संवेदनशील प्रकरणावर असे वक्तव्य करून बहुजन समाजामध्ये तेड निर्माण करणारे करणी सेनेचे अजय शेंगर यांना त्वरित रासूका, देशद्रोह व दोन समाजाच्या भावना भडकवल्या म्हणून अटक करण्यात यावी.
अन्यथा याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील असा इशारा -संजय बोर्डे संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन