प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई: रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहूने आयोजित केलेल्या २१ व्या जिल्हास्तरीय महोत्सवात सादर केलेल्या प्रा.डॉ एन डी पाटील विद्यालय,सह्याद्रीनगर यांच्या इंटर ॲक्ट क्लब’ या ई-बुलेटिनला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हा महोत्सव शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे पार पडला.
या यशाबद्दल सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या ई-बुलेटिनसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी संदेश भोसले, जाई जगदीश नलवडे, रुतिका रमेश कदम, दुर्वा सचिन यादव, सिद्धी संतोष भोसले, आयेशा मोह. शब्बीर शेख, आणि आरोही प्रमोद धुमाळ यांचा समावेश होता.
या विद्यार्थ्यांना प्रबळकर एन.एस. यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका जरे एस.एम. आणि स्थानिक स्कूल कमिटीने सर्वांचे अभिनंदन केले आहे.
अभिनंदन