कलरफुल रोषणाईने शिवाजीपार्क उजळणार

Share

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

मुंबई :- दिवाळीचा सण म्हणजे परंपरेचा उत्सवाचा व आनंदाचा क्षण याच निमित्ताने शिवाजीपार्क परिसरात करण्यात येणारी विद्युत रोषणाई म्हणजे आकर्षणाचा विषय यावर्षी देखील आकर्षक मनमोहक कलरफुल विद्युत रोषणाई करण्यात अली असून याचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान परिसरात मनसेच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात येतो यावेळी आकर्षक आणि डोळे दिपतील अशा प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात येते दिवाळी संपेपर्यंत या रोषणाईचा आनंद घेण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात.

मोठमोठे झुंबर, आकाश कंदील तोरणांची चादर वेगवेगळ्या डिझाईन मधील लाईट्स याने शिवाजीपार्क परिसर प्रफुल्लित होतो. झगमगत्या रोषणाईत सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्यासाठी सर्वचजण या क्षणाची वाट पाहत असतात.

यावर्षी शिवाजीपार्क परिसरात खाद्य पदार्थांचे स्टॉल्स देखील लावण्यात आले असून झगमगत्या रोषणाईत सेल्फी काढत खाद्य पदार्थांचा आस्वाद देखील घेता येणार आहे. तर महाराष्ट्रातील सर्व दिवाळी अंक एकाच स्टॉलवर वाचक प्रेमीना घेता येणार असल्याचे मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.


Share

5 thoughts on “कलरफुल रोषणाईने शिवाजीपार्क उजळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *