प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यात,राजकारण हे समाज कारण करण्यापेक्षा ! गुद्दा गुदिदी करणाचे झालेलं आहे.हे सगळ जनता पाहत आहे. पुढारी किंवा नेते समोरा समोर येत नाहीत.पण कार्यकर्ते विनाकारण एकमेकांसमोर लढताना, भिडताना दिसतात,हातापायी करताना दिसतात.हा अती उत्साह कधीना कधी त्यांच्या अंगलटी येतो .त्यांची पक्षापेक्षा व्यक्ती पूजा जास्त आहे.ते उगाचच आपली शक्ती नको तेथे वाया घालवीत आहेत.हीच निष्ठा आपल्या आई बाबांवर,आपल्या परिवारावर ठेवा! पहा किती आनंद मिळतो.कालचे प्रकरण पहा ना,छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारून हुल्लडबाजी करण्याची,काय गरज होती का?शेवटी सुरज चव्हाण ह्यांना
काय मिळाल?एवढ करून?ह्या नेत्यांना असे निष्ठावंत बरेच मिळतात. त्यांना कांहीच फरक पडत नाही.नेते अशा प्रसंगी! आमचा ह्या भानगडीशी कोणताही तिळमात्र समंध नाही!असे बोलून मोकळे होतात व आपले हातवर करतात.शेवटी ह्या भानगडी पक्षासाठी न होता त्या वैयक्तिक होतात.तेव्हा तुम्हाला कोणीच मदत करत नाही. तुमच्यागे कोणी उभे राहत नाही.तुम्ही एकटे पडता.मग मारता कोर्टाच्या फेऱ्या, वकिलाचा खर्च हा तुमच्या डोक्यावर पडतो.शिवाय विरुद्ध बाजूने आपल्यावर केव्हाही हल्ला होऊ शकतो, ही
भीती असतेच.निकाल लागल्यावर शिक्षा होते ती वेगळी,तिथे तुमचा पक्ष व नेते कोण येत नाहीत.नुकतच विधान भवनात घडलेल्या घटनेचं उदाहरण घ्या!नेते सुटले पण कार्यकर्ते अडकले.त्यांच्यावर कलमी गुन्हेही दाखल झाले.
आर्थिक,मानसिक,आपल्या नावाची खराबी! हा त्रास स्वतःला व कुटुंबाला.तर पदरात “o”पडते.अशा कित्तेक कार्यकर्त्यांचे संसार उध्वस्त झालेले आहेत.कित्येक देशोधडीला लागलेले आहेत.कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. कित्येक अपंग व लुळे पांगळे झालेले आहेत.ह्या प्रकारात आपण तात्पुरते सामील व्हा!पक्ष आवडतो म्हणून व्यक्ती पूजा करू नका.मोर्चात सामील व्हा,घोषणा द्या व नेत्यांची भाषणे ऐकून!सरळ घरचा रस्ता पकडा.कारण घरी आई वडील बायकामुले तुमची वाट पाहत आहेत,याचा विसर पडू देऊ नका.
Only politician
राजकरण्यांचा