किल्ले संस्कृती पुन्हा अवतरत आहे!

Share

प्रतिनिधी :एसएमसमाचार-सुरेश बोर्ले
मुंबईच्या विलेपार्ले या सांस्कृतिक नगरीत पुन्हा एकदा आपल्या “गड-किल्ल्यांची” संस्कृती अवतरत आहे. साधारणपणे १९६५ च्या सुमारास पार्ल्यातील मोकळ्या जागांवर दिवाळीच्या दिवसांत मुलं-तरुण मिळून लाल माती व दगडांनी किल्ले तयार करीत असत. त्यावर छोट्या झाडांची बी पेरली जात, मावळे-सैनिकांच्या प्रतिकृती उभ्या राहत, खेळण्यांतील विमानं उडत आणि छोटे तलाव, आगबोटी व लढाया यांचं आकर्षक चित्रण दिसत असे.

संध्याकाळच्या दिव्यांच्या प्रकाशात हे किल्ले पाहायला बाळगोपालांची गर्दी जमायची. ती बालपणातील संस्कृती, तो उत्साह, ती कल्पकता – काळाच्या ओघात हरवली. पण आज पुन्हा पार्ल्यात या गड-किल्ल्यांच्या परंपरेला नवं जीवन मिळत आहे.

समाजसेवक आणि साबरी प्रतिष्ठानचे मा. विनायक सुर्वे यांनी पार्ले प्लेग्राऊंडवरील “बाल महोत्सवा”त किल्ले-स्पर्धेचे आयोजन करून या परंपरेला नवा श्वास दिला आहे. लहानग्यांना पारितोषिके देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.

ही परंपरा केवळ पार्ल्यापुरती मर्यादित न राहता ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रायगडपर्यंत जपली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा वारसा पुढील पिढ्यांना परिचित करून देणारी ही संस्कृती जिवंत राहो — हीच सदिच्छा!


Share

3 thoughts on “किल्ले संस्कृती पुन्हा अवतरत आहे!

  1. अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतात, अशाप्रकारे मराठी संस्कृती टिकून राहील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *