
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई :मालाड पश्चिमेतील मार्वे रोड आणि बाफहीरा नगर रसऱ्यावरील खड्डे बुजवण्या साठी वाहतूक पोलिसांचा पुढाकार. कांदिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश राऊत यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्याअथक प्रयत्नाने मालाड मार्वे रोड वरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मागील काही दिवसापासून सतीश राऊत यांनी स्वत या ठिकाणी काही दिवस उभे राहून निरीक्षण केले त्यांच्या लक्षात आले की या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे आणि फेरीवाले तसेच अनियंत्रित पार्किंग मूळे हा रस्ता अरुंद होतो तसेच येथे वाहतूक संत होते त्याचा परिणाम नित्याची वाहतूक कोंडीत होतो. तसेच मार्वे रोड वर मालवणी क्रमांक १ ते खारोडी दरम्यान च्या रस्त्यावर दुभाजक नसल्याने वाहने उलट सुलट ये जा करतात त्याचा ही परिणाम वाहतूक कोंडीत होतो ही वाहतूक कोंडू दुर करायची असेल तर काही उपाय योजना करावी लागेल आणि त्यासाठी राऊत यांनी २० लोखंडी बॅरिकेड ची वयक्तिक प्रयत्न व ओळखीतून व्यवस्था केली व ते मार्वे रोड वर निट लावली तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्या साठी रेडिमेड मिक्सर च्या साह्याने येथील खड्डे बुजवण्याचे अंमलदारांना सांगितल्यावर त्यांनी त्वरित खड्डे बुजवले.सतीश राऊत यांनी गणेश विसर्जनाच्या वेळी देखील वाहतूक कोंडी होऊ नये या साठी मालाड ते मार्वे तब्ब्ल सहा किलोमीटर चा मार्ग मोकळा करत फेरी वाले, अनधिकृत पार्किंग हटवली होती. त्यांच्या या कार्याची सर्वच थरातून कौतुक होत आहे कारण मार्वे रोड वरील वाहतूक कोंडी कमी झाली तसेच फेरी वाले, अनियंत्रित पार्किंग ला ही शिस्त लावल्याने रस्ता मोकळा झाला आहे.त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
मी स्वत काही दिवस या ठिकाणी निरीक्षण करत होतो त्यावेळी काही उपाययोजना करण्याची कल्पना सुचली आणि दुभाजक नाही त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड लावले तसेच फेरी वाल्यांना रस्त्याच्या किनारी केले आणि उलट सुलट वाहने रिक्षा पार्किंग ठीक केली तसेच रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्या मूळे वाहतूक संत होऊ नये या साठी सिमेंट ने खड्डे बुजवले -वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांदिवली वाहतूक विभाग -सतीश राऊत.

Proud of you sir
स्तुत्य कार्य सलाम
Very good example
Very good
Good