गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी संस्थांचा पुढाकार.

Share

एसएमसमाचार -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्यात आला नसल्याने गरीब वंचित लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या.शिधामध्ये साखर रवा पामतेल डाळ मसाले असे पदार्थ असायचे आणि शंभर रुपयांत तो गरिबांना रेशनवर वर्षभर सणानिमित्त उपलब्ध व्हायचा.पण यंदा कोणत्याच सणाला तो देण्यात आला नाही.असे असले तरी अनेक सामाजिक संस्थांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक आदिवासी पाडे, वृद्धाश्रम आणि आदिवासी विद्यार्थ्यांना किराणा किट तसेच दिवाळी फराळ भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली.यात प्रामुख्याने जॉय ऑफ गिव्हिंग संस्था, मैत्र परिवार, युथ कौन्सिल, जनजागृती सेवा संस्था, नव क्षितिज ट्रस्ट, अभिषेक सामाजिक संस्था, निर्धार ग्रुप, सुनिर्मल फाउंडेशन यांचा समावेश होता. विविध संस्था सणानिमित्त मदतीसाठी पुढे येत असल्याचे पाहून मुंबईतील विख्यात सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. शासनाने नियमितपणे वंचित गरीब लोकांना आनंदचा शिधा द्यायलाच हवा, तो बंद करता कामा नये तसेच ज्या विधायक योजना आहेत त्या देखील सुरूच रहायला हव्यात अशी पुष्टी हिरवे यांनी जोडली.


Share

3 thoughts on “गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी संस्थांचा पुढाकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *