गांधी जयंती अभिवादन आणि सीमोल्लंघन..

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

इचलकरंजी: संविधान परिवार आणि सद्भाव मंच महाराष्ट्रवतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी संविधानिक मुल्ये आणि एकात्मतेचा विचार रुजवणारे पोस्टर हातात धरुन संदेश देण्याचा प्रयत्न केला.
प्रशांत देशपांडे सरांनी सस्नेह पाठवलेले साधना युवा दिवाळी अंक या युवकांना देण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दल इचलकरंजीचे जिल्हा अध्यक्ष अनिल होगाडे, संघटक रोहित दळवी, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा समन्वयक अशोक वरुटे, संवेदना फेलोशिप, डॉ बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थाचे सहकारी आवर्जून उपस्थित होते. याचे सूत्र संयोजन जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी केले.


Share

4 thoughts on “गांधी जयंती अभिवादन आणि सीमोल्लंघन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *