
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : गांधी बाल मंदिर शाळा, कुर्ला प्राथमिक विभागाच्या वतीने दिवाळीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुगंधी उटणे, दिवाळी फराळ आणि वह्या वाटप करून दिवाळीचा आनंद देण्यात आला.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकाहून एक सुमधूर गाणी सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष साखरे, उत्तम कोळंबेकर, संतोष जाधव, शुभदा पालकर, कल्पना माने, वत्सला शिंदे, सीमा थोरात, वारीजा भोसले आणि गणेश साळवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Very nice हैप्पी दीपावली
छान
Very good
प्रथम सर्व बाल विद्यार्थ्यांना यंदाच्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा…
अप्रतिम, अतिउत्तम,छान कार्यक्रम होता.
प्रत्येक बालमंदिर शाळेत विद्यार्थ्यांबरोबर असे सण साजरे व्हायला हवेत.जेणेकरून येणाऱ्या पिढीला सर्व सण कळतील जे काळानुसार संपत चालले आहेत…