
File photo
प्रतिनिधि:सुरेश बोरले
मुंबई,निवृत्ती ही माणसच्या आयुष्यात येतेच आणि ती घ्यावीच लागते.जशी वेगात निघालेली रेल्वे कुठेतरी थांबते,तोच प्रकार आहे.नुकतीच भारतीय3 दिग्गज खेळाडूंनी T -20 ह्या क्रिकेट च्या प्रकारातन आपली निवृत्ती जाहीर केली. तशीच निवृत्ती आता!इंग्लंडचा तेज गोलंदाज. जिमी अँडरसनने नुकत्याच झालेल्या,आपल्या शेवटच्या कसोटीत सामन्यात जाहीर केली.साल 2000साली ह्या खेळाडूने उपरोक्त संघासाठी,आपली खेळी सुरु केली व 12जुलै 2024ला त्याने अखेरचा कसोटी सामना,क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर जेथे त्याने सुरुवात केली,त्याच मैदानावर अखेरचा सामना खेळत वयाच्या 41व्यां वर्षी, देशाची आणि क्रिकेटची जवळ जवळ23 वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यावर,आपली निवृत्ती जाहीर केली.मैदानावर सगळ्यांना त्याने हात उंचावून,क्रिकेट रसिकांच्या अभिवादन स्वीकारत व प्या वेलियन! मधन एक विशेष पेय रसिकांसमोर पिऊन क्रिकेटला सर्व प्रकातातून अलविदा करून निरोप घेतला.त्यावेळेस त्याचे कुटुंबही मैदानावर हजर होते.जिमींने साश्रू नयनांनी आपल्या पत्नीला मिठी मारली.त्या वेळेस रसिकांनीही,आपले हाथ उंचावून त्याला निरोप दिला.
जिमी ची कारकीर्द!
182 कसोटी सामने खेळून,704 बळी घेतले. ओ डी आय.194 सामने खेळून 261 बळी घेतलेले आहेत. T -20,19 खेळून 18बळी मिळवले. आय पी एल.मधे देशाच्या क्रिकेट साठी,जास्त भाग घेतला नाही.जिमिला तमाम भारतीयांन तर्फे पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!