गोरेगावात ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांची  अभिवादन सभा..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई :गोरेगावात ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांची  अभिवादन सभा गुरुवार, दिनांक 11 डिसेंबर  रोजी,सायंकाळी. 6.00 वाजता गोविंद दळवी सभागृह केशव गोरे ट्रस्ट जवळ, आरे रोड, गोरेगाव पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे.समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा यांचं दि. 2 डिसेंबर 2025 रोजी निधन झालं.

राजकीय, सामाजिक, रचनात्मक आणि संघर्ष या सर्व क्षेत्रात पन्नालाल आघाडीवर होते. राजकीय आणि आर्थिक विचारवंत म्हणून ते परिचित असून त्यांनी विपुल लेखन केलं आहे. पन्नालाल सुराणा हे तीन पिढ्यांसाठी मार्गदर्शक, सल्लागार आणि प्रेरणास्थान राहिले आहेत.पन्नालालजींना अभिवादन करण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

आपण अवश्य उपस्थित रहावं ही विनंती. विश्वस्त केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली आहे.


Share

3 thoughts on “गोरेगावात ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांची  अभिवादन सभा..

  1. ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांच्या सारखे थोर महा मानवाने कलेले समाज कार्य खुप मोठी शिकवण आहे अशा या मह मानवाला कोटि कोटि नमन

  2. ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांच्या सारखे थोर महा मानवाने कलेले समाज कार्य खुप मोठी शिकवण आहे अशा या मह मानवाला कोटि कोटि नमन आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *