
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई :चारकोप विधानसभेतील वार्ड क्र. २१ येथील भाजपचे महामंत्री नितीन दांडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेना प्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दांडेकर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे चारकोपमधील स्थानिक राजकारणात शिवसेना (UBT) ला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.
या प्रसंगी शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, विभागप्रमुख संतोष राणे, युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, विधानसभाप्रमुख राजू खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
नितीन दांडेकर यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आणि जनतेशी अधिक जवळीक साधण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत, “शिवसेनेसोबत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे सामर्थ्य हे आम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे सांगितले.
चारकोप परिसरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
Bjpतुन out going सुरु
पदाधिकाऱ्यांना गळती म्हणजे त्यांच्या निष्ठेला गळती.