
प्रतिनिधी :मिलन शहा
कल्याण : कल्याणजवळ शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणारा एक प्रवासी ट्रेनमधून खाली पडला आणि एका चोरट्याने त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा पाय कापला गेला. ही घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे, चोरट्याने जखमी प्रवाशाकडून ₹२०,००० रुपये किमतीचा फोन लुटला आणि तेथून पळून गेला. गौरव रामदास निकम (२६ वर्षे, रा. नाशिक) तपोवन एक्सप्रेसने नाशिककडे जात असताना, आंबिवली स्टेशनजवळ एका १६ वर्षीय अल्पवयीन चोरट्याने प्रवाशाच्या निकमच्या हातावर हल्ला करून त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे गौरव निकम खाली पडला आणि त्याचा डावा पाय ट्रेनच्या चाकाखाली आला, ज्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतरही आरोपी थांबला नाही, त्याने जखमी गौर्चला काठ्यांनी मारहाण केली आणि त्याच्याकडून ₹ २०,००० रुपये किमतीचा फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. कल्याण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तसेच. पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
भयानक आणि रेलवे प्रश्सनवर प्रश्नचिन्ह?
Commuters safety???