
प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार
मुंबई: गोरेगाव पूर्वेतील दादा साहेब फाळके चित्र नगरीत प्रसिद्ध टीव्ही मालिकेचा सेट जळून खाक. दिनांक 23 जून रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास प्रसिद्ध टीव्ही मालिका अन्न पूर्णा च्या सेट ला आग लागली होती. या बाबत माहिती मिळताच अग्निशमन दला च्या चार गाड्या आणि पथक घटनास्थळी दाखल झाले.होते. आग भीषण होती पण अग्निशमन दलाने तत्परता दाखवत आग अवघ्या काही मिनिटात विजवली. सुदैवाने या आगीत कोणीही जख्मी नाही. मात्र येथील टेन्ट व इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखोचा आर्थिक फटका मालिकेच्या निर्मत्याला बसला आहे.अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दल पुढील तपास करत आहे.