जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण मंदिरामध्ये विविध कार्यक्रम.

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

महाराष्ट्र : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्णमंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कासार पट्टा येथील सन 1290 मधील प्राचीन काळातील श्रीकृष्ण मंदिर हे गोसावी परिवाराचे स्वतःच्या मालकीचे असून त्यांची मुले मोहन गोसावी ,महेश गोसावी, आणि मुकुंद गोसावी, यांच्याकडून प्रत्येक वर्षी अष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामध्ये श्रीकृष्ण मंदिरामध्ये सप्ताहात अखंड वीणा उभा असतो पारायण चालू असते, नित्यनेमाची पूजा, अभिषेक चालू असता अष्टमी दिवशी महा अभिषेक केला जातो.

श्री स्वामी समर्थ केंद्र इंदापूर यांच्या संयोगाने दरवर्षी श्रीकृष्ण मंदिरामध्ये गेली चार वर्षापासून परमपूज्य गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सर्व महिला व पुरुष सेवेकरी श्री गीताई पटन सेवा घेत आहेत. श्रीकृष्णाच्या स्त्रोतांचे पटण करतात. यासाठी स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख श्री प्रदीप भगत यांनी हा उपक्रम राबवला आहे. इंदापूर शहरातील हजारो भाविक श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. श्रीकृष्णाचे मंदिर भव्य दिव्य असे सजवले जाते ,पताका लावणे , श्रीकृष्णाचा पाळणा बांधणे ,लाइटिंग करणे, फुलांच्या हारांनी मंदिर सजवले जाते हे काम श्री यादव हे करत असतात. दिनांक 9 ते 15ऑगस्ट असे सात दिवस अखंड विना उभा असतो पारायण केले जाते. जन्माष्टमी चे किर्तन रात्री 10 ते 12 या वेळेत श्री .ह ,भ .प ॲड.शेषांगर महाराज बोबडे यांचे झाले. कीर्तनाला साथ श्री ह भ प खुशाल महाराज कोकाटे यांनी दिली.श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गायन, मोहन गोसावी यांनी नंतर माऊलीची तुकारामांची पांडुरंगाची श्रीकृष्णाची आरती झाल्यानंतर, गुलाल आणि फुलांची पुष्पवृष्टी श्रीकृष्णावर करण्यात आली. किर्तन झाल्यानंतर पंचपदी झाली आणि पंचपदीनंतर विना ठेवण्यात आला .कार्यक्रम संपन्न झाला. यावेळ उपस्थित महादेव चव्हाण अशोक राऊत, गंगाराम बनसोडे, मोहन शिंदे, यावेळी कासार पट्ट्यातील मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता. तसेच असंख्य पुरुष आणि महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. अष्टमी नंतर प्रसाद वाटप करण्यात आले.रात्री 2.00 वाजेपर्यंत गोकुळाष्टमी चा कार्यक्रम संपन्न झाला.


Share

One thought on “जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण मंदिरामध्ये विविध कार्यक्रम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *