
File photo.
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली :कारागृहातील खालच्या जातीतील लोकांना साफसफाई आणि झाडू मारण्याचे काम आणि उच्चवर्णीयांना स्वयंपाक करण्याचे काम देऊन थेट भेदभाव केला जात असून हे कलम 15 चे उल्लंघन आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाने काही राज्यांच्या जेल मॅन्युअलमधील भेदभावपूर्ण तरतुदी आणि जाती-आधारित भेदभाव नाकारले,कामाची विभागणी आणि कैद्यांना त्यांच्या जातीनुसार वेगळ्या वॉर्डात ठेवण्याच्या प्रथेचा निषेध केला.