प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : चारकोप,सह्याद्रीनगर: रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही गटांत यश मिळवत आपला डंका वाजवला. मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या या स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या प्रतिनिधींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
विद्यार्थी गटात कुमारी दुर्वा यादवला तृतीय पारितोषिक
विलेपार्ले येथील माधवराव भागवत हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गटाच्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयाच्या कुमारी दुर्वा सचिन यादव हिने लहान गटातून तृतीय पारितोषिक पटकावले. दुर्वाने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोत्यांची मने जिंकली आणि विद्यालयाचे नाव उज्वल केले.
शिक्षक गटात श्री. प्रबळकर एन. एस. यांना द्वितीय स्थान
याच स्पर्धेच्या शिक्षक गटातून विद्यालयाचे शिक्षक श्री. प्रबळकर एन. एस. यांनी अंधेरी येथील परांजपे विद्यालय येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी उत्कृष्ट वक्तृत्व सादर करत द्वितीय पारितोषिक मिळवले. त्यांच्या या यशाने विद्यालयाच्या शिक्षक वर्गाचा गौरव वाढवला आहे.
विद्यार्थिनी आणि शिक्षकाने मिळवलेल्या या दुहेरी यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी आणि मुख्याध्यापक यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations
Congratulations