
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : प्रा डॉ एन डी पाटील विद्यालय,कांदिवली पश्चिम येथे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती आणि एक व्यासंगी वाचक व लेखक डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या “वाचन प्रेरणा दिन “ कलाम यांचे प्रतिमा पूजन मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जरे आणि शिक्षकांनी केले.त्यांच्या बद्दल आणि उत्तम वाचन कसे करावे याबद्दल शिक्षिका सौ डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.विदयालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता प्रबोध सलगर हिचे स्वलिखित पुस्तक प्रकाशनाचया मार्गांवर असून तिने पुस्तक लेखन आणि प्रकाशन या प्रवासात तिला काय अनुभव आले याबद्दल सविस्तर माहिती दिली,तसेच कल्पनारम्य पुस्तक लिहिताना वेगळ्या प्रकारे विचा कसे करावे याबद्दल सांगितले.
यानंतर आयोजित पुस्तक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मनसोक्त पुस्तक हाताळणे व वाचनाचा आनंद घेतला.

छान उपक्रम
Bohot acha
Very nice
Very gd initiative