प्रतिनिधी : कृष्णा वाघमारे
मुंबई : जॉय ऑफ गिविंग संस्था मुंबई यांच्या कार्याध्यक्ष असुंता डिसोझा, पत्रकार पूनम पाटगावे, शिक्षिका योगिता हिरवे, माजी सैनिक, चंद्रशेखर सावंत आदी मान्यवरांना आदर्श समाजरत्न, आदर्श शिक्षिका, आदर्श पत्रकार असे पुरस्कार जाहीर झाले आहेत.येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अंबरनाथ येथील आदर्श रायगड वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी कार्यक्रमात सदर पुरस्कारांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजक आणि कार्यकारी संपादक शैलेश सणस यांनी सांगितले.यावेळी जॉय संस्थे बरोबरच अनेक संस्था, आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देखील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.मागील अनेक वर्षापासून संपादक रमेश सणस, उपसंपादक अविनाश म्हात्रे आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्त वाहिनीच्या कामासाठी खूप मेहनत घेत असल्याचे शैलेश सणस यांनी सांगितले.कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व थरातून विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहें.
Very nice.
अभिनंदन
Congratulations