
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई :जोगेश्वरी एसव्ही रोड वर शाळे समोर गतिरोधक बसावण्याची मागणी. जोगेश्वरी पश्चिमेतील स्वामी विवेकानंद रस्त्यावर एक्सेल कंपनी समोर आणि येथील मिल्लत शाळे समोर गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिकांनी पालिके कडे केली आहे. मागील सहा महिन्यापूर्वी पालिका ‘के’ पश्चिम विभागात रस्ते खात्याकडे या बाबत निवेदन ही देण्यात आले आहे मात्र पालिके ने त्यावर कारवाई केलेली नाही शाळेत दर रोज दिड ते दोन हजार मुलं, मुली शिकण्यासाठी येतात त्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहणांनी येथे दुर्घटनेची संभावना अधीक आहे.त्यामुळे या विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे.या ठिकाणी पूर्वी गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग होत मात्र रस्त्याच्या काँक्रिटिकरणानंतर केलेल्या खोद काम करताना ही गती रोधक येथून काढण्यात आले मात्र रस्ता बनून अनेक महिने गेले तरी नियमाने पालिकेने गतिरोधक पुन्हा बनवले पाहिजेल होते मात्र तसं झालं नाही पालिकेला याचा विसर पडला दिसतोय स्थानिकांनी तसेच पालकांनी या ठिकाणी त्वरित गतिरोधक बनवण्याची मागणी पालिका ‘के’ पश्चिम विभागीय आयुक्ता कडे केली आहे.
या गोष्टीनसाठी पणमागणी करावी लागते?