
मुंबई : दिनांक २ ऑक्टोबर, राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त के-ई वॉर्ड मुंबई महानगर पालिका कर्मचारी व भाजप कार्यकर्त्यांच्या सहकार्याने माजी नगरसेवक पंकज यादव यांनी जोगेश्वरी (पूर्व) स्थानक परिसरात स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या उपक्रमाद्वारे परिसराची स्वच्छता तर झालीच, तसेच जीवनातील अनावश्यक व अप्रासंगिक गोष्टी दूर करून आपले आयुष्य सुंदर व सुसंस्कृत करण्याचा संदेश ही देण्यात आला.
दसरा सणाचा खरा अर्थ म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. त्याच भावनेने ही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी सर्व नागरिकांनी एकमेकांस दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
Good
छान