जोगेश्वरी येथील श्री समर्थ विद्यालयात आषाढीचा जल्लोष…

Share

प्रतिनिधी :राजेश पंड्या

मुंबई : जोगेश्वरी पूर्व बांद्रेकर वाडीतील श्री समर्थ शाळेत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सकाळी बांद्रेकर वाडीतून प्रभातफेरी आणि दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक, माध्यमिक व तंत्र शाखेतील अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, संताची वेशभूषा केली होती.विठू नामाच्या गजरात गाणी गाऊन आणि जयघोष करीत अनेकजण दिंडीत सहभागी झाले होते.जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी पण उत्साहाने दिंडी पालखीचे दर्शन घेतले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण निरीक्षक कार्यालय पश्चिम विभागाचे अधीक्षक महेश खामकर  उपस्थित होते.त्यांना देखील गायनाची आवड असल्याने त्यांनी कानडा राजा पंढरीचा हा अभंग अत्यंत सुरेख चालीत गायला आणि उपस्थितांची वाहवा मिळविली.समर्थ संस्थेचे उपाध्यक्ष दिनकर तावडे, सचिव सुनील नलावडे, तसेच दीपक सरदेसाई, दामोदर कुंदर, किशोर साळवी, रामचंद्र पाटकर, प्रभाकर मिराशी, गणेश हिरवे, आदी पदाधिकारी प्राथमिकाच्या सुनीता निंबाळकर आणि माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीकांत वाडेकर आदी मान्यवर वेळतवेळ काढून उपस्थित होते.मुलांनी देखील अनेक अभंग उत्कृष्ट रित्या म्हणून दाखविले. दरवर्षी विविध सण उत्सव या शाळेत मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.सूत्रसंचालन शिक्षक योगेश राजापकर यांनी केले.


Share

One thought on “जोगेश्वरी येथील श्री समर्थ विद्यालयात आषाढीचा जल्लोष…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *