
प्रतिनिधी :कृष्णा वाघमारे
मुंबई :मालाड पश्चिमेतील लिंक रोड येथे बीकाजीदुकाना समोरगोरेगाव च्या दिशेने ने येणाऱ्या बेस्ट बस ने महिलेला चिरडले.साधारणतं संध्याकाळी 5.15 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ महिला तिचे वय अंदाजे 60 वर्ष आहे ती आणि तिचा अंध पती पलीकडून रस्ता ओलांडून येत होते दुभाजक उंच असल्याने जेम तेम चडून उतरण्याच्या घाईत तिचा तोल गेला आणि बेस्ट बस रूट क्रमांक 224 च्या खाली ती आली आणि बस च चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट चालकाने दुर्घटना टाळण्याचे प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने दुर्घटना घडली. विशेष म्हणजे याच रस्त्यावर काही फेरी वाल्यांनी धंदे रस्त्यावरच लावले होते त्या मुळे ही बेस्ट चालकाला अरुंद रस्त्यावर दुर्घटना टाळने शक्य झाले नाही.घटना घडली महिला गेली पण या दुर्घटनेने त्या अंध व्यक्तीच्या जीवनाचा सुख दुःखाचा साथी हिरावून घेतल्याने त्यांचे ही आयुष्य पुढे मोठं प्रश्न चिन्ह आलं आहे.
पोलीस, बेस्ट अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.महिलेचा शव शवविच्छेदना साठी पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले व पुढील तपास करीत आहेत.
Rip