
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप कांदिवली पश्चिम येथील शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका शशिकला किरण जाधव या करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत
“अर्धांगिनी एक पूर्णत्व” या सामाजिक संस्थेमार्फत ‘ “सन्मान तिच्या कर्तुत्वाचा’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे. येत्या सोमवारी ११ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे सत्कार सोहळा असणार आहे.
शशिकला जाधवयांच्या अंधश्रद्धा निर्मूलना आणि जादूटोणाविरोधी कायद्याबाबत करीत असलेले सामाजिक कार्य, मराठी भाषा वृद्धिंगत करण्याबाबत करीत असलेले कार्य, कॅन्सर रुग्णांकरिता करीत असलेल्या कार्याबाबत, देहदान आणि अवयवदान बाबत करीत असलेले जनजागृती कार्य, विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शिक्षण आणि व्यसनमुक्तीबाबत करीत असलेले कार्य, योगाभ्यास क्षेत्रात करीत असलेले कार्य, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबाबत करीत असलेले कार्य इत्यादी कार्याची दखल घेऊन “अर्धांगिनी एक पूर्णत्व” या सामाजिक संस्थेमार्फत ‘ सन्मान तिच्या कर्तुत्वाचा’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे. शशिकला किरण जाधव यांचेसर्वच थरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Congratulations mam
Congratulations on your great achievement
Congratulation