
Photo courtesy: आम्ही गिरगांकर
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई : वरळीतील मनसे प्रमुख
मा.राज ठाकरे व शिवसेना प्रमुख मा.उद्धव ठाकरे!हे दोन्ही बंधू हिंदी आज जी आर रद्द केल्याचा,विज्योत्सव साजरा करायला एकत्र आले. सादरवेळी दोघांनीही ‘युती”जाहीर केली. ही युती अभेद्य व आबादित राहील.तर कोणताही नाही झेंडा फक्त “मराठी बाणा” हाच आजचा अजेंडा!हा मनसुबा दोन्ही बांधवांचा व त्यात सामील पक्ष्यांचा होता.प्रथम राज ठाकरे ह्यांनी मार्गदर्शन करत मिश्किल कोपरखळी,मारत,ते!म्हणाले,जे काम २०वर्षाहून अधिक काळ शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेबांना!दोघांना एकत्र आणण्याचं जमल नाही,ते मुखमंत्री फडणवीसांनी चूटकी सरशी केलं.हे ऐकून,संपूर्ण वरळी केंद्रातील उपस्थितांनी हास्य अभियान पिकवला.त्यांनी देवेंद्रजींची खिल्ली उडवली! हो हे खरं आहे.कारण फडणवीसांनी मराठी जनतेला,हिंदी सक्ती करण्यासाठी चाचपून पहिले! मग मुंबईचा गेम खेळू!पण राज साहेबांनी सगळ्या मराठी भाषिकांना,पक्षांना एकत्र करून, सरकारला दोन्ही जी आर रद्द करण्यास,भाग पाडले.ही कृती देवेंद्रजिनना भारी पडली व ह्याच मराठी मुद्दावर ही भाऊ एकत्र आले.ह्या युतीची चातका सारखी वाट पाहणारे कार्यकर्ते सुखावले.ही युती मराठी अस्मितेसाठी टिकून राहो,हीच महाराष्ट्राची मनोकामना आहे.एकंदरीत भूमिपुत्रांची
तेथे उपस्थितीती पाहता!येणाऱ्या काळात मतदानाची समीकरणे बदलणार आहेत,हे निश्चित.त्यामुळे सगळेच हादरलेल्या अवस्थेत आहेत.मुख्य मंत्र्यांनाही मराठीची अवस्था माहीत आहे कमळा बाईंच्याही मराठी कार्यकर्त्यांना ही युती
भूमीपुत्रांसाठी हवी आहे.पण दिल्लीचा दबावापुढे त्याचे कांहीच चालत नाही.तर कणकवलीवाले,ठाणेवाले व
इतर ४० चाचे त्यांची भांभेरी उडाली आहे,हे दूरचत्रवाणीवर जाणवते आहे. “जय गुजरात”चा नारा पुष्पाने दाढीवर हात फिरवत, इच्छा नसताना लावलेला आहे.म्हणजेच सगळे जाणतात की मराठी मनगटात किती ताकद आहे.सत्ता पालट हा त्यांचा डाव्या हाताचा मळ आहे फक्त भूमी पुत्रानी!मनावर घ्यावे.
मराठी भाषे साठी का होई ना एकत्र आल्याने महाराष्ट्राचे भलेच होणार