प्रतिनिधी :मिलन शहा
भाजपाच्या महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्वेषी भूमिकेविरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो.
माय मराठीच्या अस्मितेसाठी, सन्मानासाठीच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत.: काँग्रेस
मुंबई : महाराष्ट्र पहिलीपासून हिंदी सक्तीला सर्वांचाच विरोध आहे. पण भाजपा जाणीवपूर्वक हिंदीची सक्ती करत होता. जनतेच्या रेट्यामुळे त्यांना जीआर रद्द करावा लागला आहे. हिंदी, ऊर्दु, तेलुगू, कन्नड या भाषाही राज्यात शिकवल्या जातात पण त्याची सक्ती नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात ची घोषणा देऊन आपली लाचारी दाखवत महाराष्ट्राचा अपमान केला तर आज त्यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज व मराठीचा अपमान केला. शिंदेसेना व एकनाथ शिंदे यांनी माफी
मागितली पाहिजे.
खासदार वर्षा एकनाथ गायकवाड, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस.