प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : जी मराठी अस्मिता व स्थान स्व. बाळा साहेबांनी मराठी भूमिपुत्राला मिळवून दिल आहे,त्याला तोड नाही! हे कार्य कुणालाच जमलं नाही आणि जमणारही नाही.अनेक मराठी कुटुंबावर त्यांचे उपकार आहेत.शेवटी कितीही करा, मराठी हा स्वार्थी आहे. तो फितुर आहे तो प्रश्न वेगळा!कारण कामापुरते मामा हे प्रत्येक जाती धर्मात आहेत.असो!पण त्यांच्या नंतर “बाप शे बेटा सवाई”असा कोणी मराठी नेता अस्मितेसाठी मा.साहेबाननंतर निपजला नाही.हे मोठ दुःख समाजात आहे.शिवसेनेत उभी फूट पडली,ती का व कशी पडली ते सेना सोडून गेलेल्यानच माहिती.पण अशा कृतीने.मराठी माणूस देशोधडीला लागला.तो अनेक पक्षात विखूरला.तो ह्याच आशेने की मायभूमीसाठी कोणतरी निपजेल? पण स्व.साहेबानंतर कुणी झालेच नाही.हे आपले दुर्दैव आहे. आता मराठी अस्मिता जागी होत आहे.कारण कारण परप्रांतीय लोंढे आवरा!ही बाब त्यावेळी साहेबांनी काँग्रेसी सरकारला निदर्शनास आणून दिले होते.पण ह्या मतलबी सरकारने आपल्या मतांच्या भीकेसाठी ते केलं नाही. आता ते डोईजड झालेत,माजलेत. मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू नुकतेच एका व्यासपीठावर आले. मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी सुखावला.पण अजूनही दोघं तळ्यात मळ्यात आहेत.आपली भूमिका अजून स्पष्ट करीत नाहीत!हे दुर्दैव आहे.मोठा बोलतो थांबा स्वराज्य निवडणुका येऊ द्या!मग पाहू.तर छोट्याची भूमिका!अजून संशयी आहे. कुणीच युतीची वाच्यता करू नका,फक्त मराठी भाषेसाठी एकत्र आले आहोत,असे ते म्हणत आहेत.म्हणजे पुढचे पाठ आणि मागचे सपाट. मग मराठी जनतेने समजायचे काय? मराठी मते फक्त आपल्या पक्षासाठी व राजकारणासाठीच दोघांना पाहिजेत का?असा लोकांचा समज झाला तर?.आता कुठे मराठी जागा झालेला आहे.तो एकसंध होत आहे,फक्त तुमच्याच भरोश्यावर आणि विश्वासावर.
मोठ्याच कांहीतरी मा.साहेबांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे.छोटे नवाब आपल काय आहे?आपल्यात बाळासाहेब दिसतात,म्हणून आपल्याला लोक ऐकायला येतात.कोण मतदान करतं?हे आपणच अनेकवेळा लोकांसमोर मान्य केलेलं आहे.मग कशाला लोकांना संभ्रमात ठेवताय? लोकांचे असे ही मत आहे.स्वताला पुष्पा समजणाऱ्या अलिबाबाने ४० चोरांच्या गद्दारीने!बडे मियांचा खिसा रिकामाच केला आहे.फक्त दोघांना मराठी माणूसच तारु शकेल? ही काळाची पावले ओळखूनच!आपण मराठी हित जपले तरच दोघांचा टिकाव लागेल.ही काळ्या दगडाची रेष आहे.तीच तुम्हाला तारु शकते.अन्यथा आपण फक्त लोकांसमोर येऊन,पाया पडायचे हेच उरले आहे.हा मराठी मानाचा हेका आहे.ही आपल्याला शेवटची संधी आहे.नाहीतरी मराठी हा दबलेला आहे.आता त्याला हात द्यायचा का डूबवायचा! नाहीतर तुम्ही दोघांनी त्याच्या बरोबर बुडाला जायचे हे तुम्हीच ठरवा!कारण मराठी माणूस आता क्रांतीसाठी उठला आहे.ह्याची जाण आपण ठेवा. त्याला कडेवर घेऊनच पुढे जाण्याची गरज तुम्हाला आहे.कारण “मरे को क्या मारना”अशी त्याची गत आहेच.कारण स्व.बाळासाहेब आज हवे होते.हे सारखं राहून राहून वाटत आहे.त्यांनी पुन्हा अवतार घ्यावा! ही आमची भावना आहे.ही संधी दोन्ही ठाकरे शिलेदारांना मिळालेली आहे.त्याचे आपण सोने करावे.फक्त मराठी हा स्थानिक मुद्दा घेऊनच विरोधात प्रवास करावा.जर सत्तेत बसलात,तर दोघांचा तो शेवटचा दिवस असेल.कारण वक्ता न बनता आपण श्रोत्यांत राहिल्यास, विरोधात राहिल्यास, मराठी माणूस आपल्या व तुमच्या पुढच्या पिढीच्या मागे भक्कम उभा राहील.तरच मराठी अस्मिता व तुम्ही आम्ही टिकू!ही भूमी पुत्रांची मनोकामना पूर्ण होणार का??
Right
बरोबर