
एसएमएस प्रतिनिधी – वैशाली महाडिक
मुंबई : मालाड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ४९ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी नगरसेविका संगीता सुतार यांनी प्रचारात आघाडी घेत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अवघ्या दोन दिवसांत त्यांनी संपूर्ण प्रभाग अक्षरशः पिंजून काढत जोरदार प्रचार केला आहे.
मढ येथील निवडणूक कार्यालयापासून मढ चर्च, हिरादेवी मंदिर मागील परिसर, भाटी गाव, मास्तरवाडी, कृष्णाचा पाडा, एरंगळ गाव, योगाश्रम डोंगर पाडा, धारवली गाव, अक्सा गाव आदी भागांत त्यांनी प्रत्यक्ष भेटी देत मतदारांशी संवाद साधला.

तसेच मढ निवडणूक कार्यालय ते नवानगर, पातवाडी, लोचर गाव, वांजरे गल्ली, भोतकर गल्ली, मधला पाडा, वांजे गल्ली या परिसरांत प्रचार फेरी व रॅली काढण्यात आली. याशिवाय आंबोजवाडी, मालवणी क्रमांक ८ परिसरातही घरोघरी जाऊन मतदारांचा संपर्क साधण्यात आला.
संगिता सुतार यांच्या या आक्रमक व लोकाभिमुख प्रचारामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रचाराच्या आघाडीवर त्यांनी विरोधकांवर स्पष्ट आघाडी मिळवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Great efforts