ठाण्यात ‘आपला दवाखाना’चा फज्जा!

Share

एसएमएस -प्रतिनिधी – सुरेश बोर्ले

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या “आपला दवाखाना” या उपक्रमाचा ठाण्यातील माजिवडा येथील केंद्र आता बंद झाले आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी साड्यांचे दुकान सुरू करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठाणेकर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “आपला दवाखाना” ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र, माजिवडा येथील दवाखाना अचानक बंद पडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्या जागेच्या मालकिणीने सांगितले की —

“दवाखान्याचे अनेक महिन्यांचे भाडे थकले होते, तसेच डॉक्टर आणि नर्सेस यांचे वेतनही रखडले होते. नाईलाजाने ती जागा साडी विक्रेत्याला द्यावी लागली.”

सरकारने या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असतानाही अशी अवस्था झाल्याने नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या या घटनेमुळे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा धुळीस मिळाल्याचे बोलले जात आहे.
आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम निश्चितपणे जाणवणार, असा सूर जनतेत उमटत आहे.


Share

4 thoughts on “ठाण्यात ‘आपला दवाखाना’चा फज्जा!

  1. खुद्द माजी मुख्यमंत्री तथा सध्या उपमुख्यमंत्री यांच्या ठाण्याच्या बालेकिल्लात ” आपला दवाखाना ” ची ही अवस्था! सत्तेत असलेल्या ” फडणवीस ” तथा ” शिंदे “सरकारने ” आपला दवाखाना ” साठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले पैसे गेले कुठे…याची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर सरकारच्या निवामानुसार कारवाई करावी व
    सामान्य मतदार जनतेसाठी ” आपला दवाखाना ” पुन्हा सुरू करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *