
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई : भारतभरातील विवाहित महिलांचे सौंदर्य, आत्मविश्वास आणि सक्षमीकरण साजरे करणाऱ्या प्रतिष्ठित मिसेस इंडिया सौंदर्यस्पर्धेत यावर्षी सरकारी दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई यांच्या डीन डॉ. डिंपल पडावे यांनी सुपर क्लासिक मिसेस इंडिया हा मानाचा किताब पटकावला आहे.
मिसेस इंडिया ही मिसेस इंडिया पेजंट्स अँड प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडची नोंदणीकृत ट्रेडमार्क स्पर्धा असून, तिची स्थापना माजी मिसेस एशिया इंटरनॅशनल दीपाली फडणीस यांनी केली आहे. ही भारतातील एकमेव अधिकृत आणि नोंदणीकृत मिसेस इंडिया सौंदर्यस्पर्धा मानली जाते.
ही स्पर्धा विवाहित, विभक्त, घटस्फोटित तसेच विधवा महिलांसाठी खुली असून, वयोगटानुसार विविध श्रेणींमध्ये सहभागाची संधी उपलब्ध करून देते.
मिसेस इंडिया: वय २१ ते ४० वर्षे,क्लासिक मिसेस इंडिया: वय ४० ते ६० वर्षे,सुपर क्लासिक मिसेस इंडिया: वय ६० वर्षांपेक्षा अधिक.
या वर्षी मिसेस इंडिया २०२५ च्या भव्य अंतिम फेरीचे आयोजन राजस्थानमधील जयपूर येथील जयबाग पॅलेस येथे करण्यात आले होते. या अंतिम फेरीत डॉ. डिंपल पडावे यांनी त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी वाटचालीच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत हा किताब पटकावला.
डॉ. पडावे यांच्या या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रासह समाजातील महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
Great achievement
Superb
Superb u ❤️
विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत असा भेदभाव न करता अनेक महिलांना संधी मिळाली त्यामुळे सर्वच महिलांना सहभाग घेता आला.. विजेत्यांच अभिनंदन!…
विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत असा भेदभाव न करता अनेक महिलांना संधी मिळाली त्यामुळे सर्वच महिलांना सहभाग घेता आला, विजेत्यांच अभिनंदन!…