तेजिंदर सिंग तिवाना यांच्या प्रचारासाठी भाऊ कदम रस्त्यावर उतरले.

Share


“नगरसेवक नसतानाही जो माणूस काम करतो, तोच खरा जनप्रतिनिधी” – भाऊ कदम
मुंबई: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक ४७ मध्ये महायुतीचे उमेदवार तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी भव्य रोड शो काढत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. या रोड शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाऊ कदम यांनी आपल्या खास शैलीत विनोद आणि गंभीर मुद्द्यांचा समतोल साधत तेजिंदर तिवाना यांच्या कार्याची प्रशंसा केली.
“राजकारण मला फारसं कळत नाही, पण माणसं ओळखता येतात,” असे सांगत त्यांनी तेजिंदर तिवाना हे खऱ्या अर्थाने जनतेतून उभे राहिलेले नेतृत्व असल्याचे नमूद केले.
भाऊ कदम पुढे म्हणाले,
“अनेकदा नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांना भेटणंही कठीण होतं. पण तेजिंदर तिवाना नगरसेवक नसतानाही लोकांची कामं करत आहेत. आज वार्ड ४७ मध्ये कुणाला अडचण आली की लोक विचारतात – ‘मदतीचा ठिकाणा कुठे आहे?’ आणि उत्तर एकच मिळतं – तेजिंदर सतनाम सिंग तिवाना.”
ते पुढे म्हणाले,
“ज्याच्याकडे आज कोणतंही अधिकृत पद नाही, तरी जो माणूस इतक्या प्रामाणिकपणे लोकांसाठी धावतो आहे, तो उद्या नगरसेवक झाला तर विकासाची गती किती वाढेल याची कल्पनाच केलेली बरी. मग लोकांना पालिकेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, पालिकाच लोकांच्या दारात येईल.”
मतदानाबाबत आवाहन करताना भाऊ कदम म्हणाले,
“मत ही फुकट देण्याची गोष्ट नाही; ती आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक जर कुणावर करायची असेल, तर ती तेजिंदर तिवाना यांच्यावरच करावी. माणूस म्हणून एक नंबर आणि कामाच्या बाबतीत शंभर टक्के विश्वासार्ह.”
या रोड शो दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘मदतीचा ठिकाणा’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांना वार्ड ४७ साठी योग्य व विश्वासार्ह पर्याय मानले जात असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.


Share

2 thoughts on “तेजिंदर सिंग तिवाना यांच्या प्रचारासाठी भाऊ कदम रस्त्यावर उतरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *